MH 10 Marathi

Maharashtra Board Class 10 Marathi Kumarbharti Solutions Chapter 1 जय जय हे भारत देशा

Maharashtra Board Class 10 Marathi Kumarbharti Solutions Chapter 1 जय जय हे भारत देशा

Maharashtra State Board Class 10 Marathi Kumarbharti Chapter 1 जय जय हे भारत देशा

शब्दार्थ

तपोवन – तपस्व्यांचे वास्तव्य असणारे वन. उजळली – प्रकाशमय झाली. उपनिषदे – वेदांचे सार. नररत्ने – वीरपुरुष, देशभक्त. खाण – भांडार. युग – काही शतकांचा कालखंड. धैर्य – धाडस, हिंमत. छळ – जुलूम. नच – नाहीच. वाकल्या माना – शरणागत. कापरे – भीती. अभिमान – सार्थ गर्व. आत्मशक्ती – स्वबळ, मनाची शक्ती. त्याग – सोडणे. श्रम – कष्ट, मेहनत. धुंद – आनंदाने बेभान. हरित क्रांती – धनधान्याची विपुलता. विश्वशांती – जगामध्ये शांतता नांदणे. कंगाल – दरिद्री. थरारल्या – शहारल्या. झळकत – प्रकाशत. मशाल – मोठी ज्योत. लोकशक्ती – लोकांची एकजूट, एकता. दलितमुक्ती – पीडितांची शोषणापासून सुटका.

 

कवितेचा (गीताचा) भावार्थ

हे माझ्या प्रिय भारत देशा, तुझा जयजयकार असो! तू नवीन जगाची आशा आहेस.

तपोवनातून उपनिषदांतील तत्त्वज्ञानाची भाषा प्रकाशमय झाली. तुझ्या मातृभूमीत शूरवीर पुरुषांच्या खाणी जन्माला आल्या; उदयाला आल्या. युगानुयुगे तू जगाला धैर्याची शिकवण दिली आहेस. तू नवीन सूर्याचा तेजस्वी देश आहेस. तू नवीन जगाची प्रेरणा आहेस. तुझा जयजयकार असो.

जुलूम-जबरदस्तीपुढे, मारक शक्तीपुढे आणि छळ करणाऱ्या व्यवस्थेपुढे तू कधी वाकला नाहीस, शरण आला नाहीस. तुझा शूर पराक्रमी स्वाभिमान पाहून अन्यायालाही भीतीचे कापरे भरते. अन्यायाला धडकी भरते. हे आत्मबळाच्या देशा, हे त्यागाच्या नि भक्तीच्या देशा, तुझा विजय असो. तू नवीन जगाची आस आहेस, तुझा जयजयकार असो.

घाम गाळून, कष्ट करून पिकलेली शेते आनंदाने बेहोश होऊन डोलत आहेत. घामाच्या थेंबांतून शेतकऱ्याच्या हृदयातील आनंद ओसंडतो आहे. तू हरितक्रांतीचा देश आहेस, तू विश्वामध्ये शांती नांदवणारा देश आहेस, तुझा विजय असो. तू नवीन जगाची आशा आहेस. हे भारत देशा, तुझा जयजयकार असो.

दैन्य-दारिद्र्याच्या घोर अन्यायाला जाळणाऱ्या मशाली आता पेटून झळाळत आहेत. त्यामुळे भोवताली भुकेकंगालांच्या झोपड्या आनंदाने शहारत आहेत. जनतेची एकजूट असलेल्या, हे लोकशक्तीच्या देशा, तुझा विजय असो. सर्व शोषित-पीडित जनांच्या मुक्तीचा तू देश आहेस. तू नव्या जगाची एकमेव आशा आहेस. हे भारत देशा, तुझा बुलंद जयजयकार असो.

The Complete Educational Website

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *