Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 18 पैशांचे व्यवहार
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 18 पैशांचे व्यवहार
Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 18 पैशांचे व्यवहार
5th Standard Marathi Digest Chapter 18 पैशांचे व्यवहार Textbook Questions and Answers
प्रश्न 1.
खालील चित्रांत पैशांचे व्यवहार कोणकोणत्या ठिकाणी झाले आहेत, ते लिहा.
- बँक कार्यालय
- भाजी बाजार
- वीज देयक केंद्र
- पोस्ट कार्यालय
- कपड्याचे दुकान
- चप्पलचे दुकान
- दूरध्वनी केंद्र
1. वरील चित्रांत दाखवलेल्या ठिकाणांना पालकांसोबत भेट दया. तेथे काय काय पाहिले ते वर्गात सांगा.
प्रश्न 1.
वरील चित्रांत दाखवलेल्या ठिकाणांना पालकांसोबत भेट दया. तेथे काय काय पाहिले ते वर्गात सांगा.
2. बँकेत चालणारे पैशांचे कोणतेही दोन व्यवहार सांगा.
प्रश्न 1.
बँकेत चालणारे पैशांचे कोणतेही दोन व्यवहार सांगा.
3. जोड्या जुळवा.
प्रश्न 1.
जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. कर्जाचा हप्ता भरणे | (अ) पोस्ट ऑफिस |
2. विजेचे बिल भरणे | (ब) दूरध्वनी केंद्र |
3. मनिऑर्डर करणे | (क) सोनाराचे दुकान |
4. फोनचे बिल | (ड) वीज देयक केंद्र |
5. दागिने घडवणे | (ई) बँक |
उत्तर:
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1. कर्जाचा हप्ता भरणे | (ई) बँक |
2. विजेचे बिल भरणे | (ड) वीज देयक केंद्र |
3. मनिऑर्डर करणे | (अ) पोस्ट ऑफिस |
4. फोनचे बिल | (ब) दूरध्वनी केंद्र |
5. दागिने घडवणे | (क) सोनाराचे दुकान |
4. दुकानात जा. खालील वस्तूंचे भाव माहित करून घ्या. किंमत लिहा.
प्रश्न 1.
दुकानात जा. खालील वस्तूंचे भाव माहित करून घ्या. किंमत लिहा.
उत्तरः
- ₹ 40
- ₹ 80
- ₹ 12
- ₹ 120
- ₹ 350
- ₹ 250
5. बँकेत चालणाऱ्या व्यवहारांपुढे (✓) अशी खूण करा. बँकेत होत नसलेल्या व्यवहारांपुढे (✗) अशी खूण करा.
प्रश्न 1.
बँकेत चालणाऱ्या व्यवहारांपुढे (✓) अशी खूण करा. बँकेत होत नसलेल्या व्यवहारांपुढे (✗) अशी खूण करा.
उत्तर:
- पैसे भरणे [✓]
- पैसे काढणे [✓]
- पत्र टाकणे [✗]
- चेक देणे [✓]
- मनिऑर्डर करणे [✗]
- विम्याची रक्कम भरणे [✗]
- दागिने सुरक्षित ठेवणे [✓]
- चेक वटवणे [✓]
- वीज बिल भरणे [✗]
- कर्ज घेणे [✓]
- दागिने गहाण ठेवणे [✓]
- मुदत ठेवीच्या योजना.[✓]
उपक्रम:
भाजी मंडईला भेट द्या. तेथे विकल्या जाणाऱ्या भाज्यांची यादी करा. भाज्यांचे प्रतिकिलो दर विचारा. ‘भाजी मंडई’ यावर पाच ते सात वाक्ये माहिती लिहा.
वाचू आणि हसू:
- सोनू: मिनू, माझ्या बाबांनी कालच ‘इनोव्हा कार’ घेतली. आता आमच्याकडे तीन गाड्या झाल्या.
- मिनू: अरे सोनू, माझ्या बाबांकडे कार, स्कूटर, रेल्वे, अगदी विमानसुद्धा आहे.
- सोनू: अरे वा! मग तर तू सगळ्याच वाहनांतून फिरली असशील!
- मिनू: नाही रे! माझ्या बाबांचं खेळण्यांचं दुकान आहे ना!
लिहा:
दिलेल्या अक्षरांपासून सुरू होणारे शब्द लिहा.
Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 18 पैशांचे व्यवहार Additional Important Questions and Answers
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
तुम्ही पैशांचे व्यवहार कोठे करता?
उत्तर:
दुकानात, बँकेत आम्ही पैशांचे व्यवहार करतो.
प्रश्न 2.
शाळा सुरू झाल्यावर तुम्ही कोणकोणत्या गोष्टी खरेदी करता?
उत्तर:
शाळा सुरू झाल्यावर आम्ही शाळोपयोगी वस्तू म्हणजेच दप्तर, पुस्तके, वह्या, गणवेश, कंपास, पेन, पेन्सिल, इत्यादी वस्तू खरेदी करतो.
प्रश्न 3.
घर खर्चामध्ये कोणकोणती बिले भरावी लागतात. त्यांपैकी कोणतीही चार लिहा.
उत्तर:
लाईटबिल, फोनबिल, दूधबिल, पेपरबिल इत्यादी.
प्रश्न 4.
तुम्ही कशाकशाची बचत करता ते लिहा. जसे – पाणी.
उत्तर:
अन्न, इंधन, वीज
प्रश्न 5.
बँकेत चालणारे पैशांचे कोणतेही दोन व्यवहार सांगा.
उत्तर:
1. पैसे भरणे
2. पैसे काढणे
3. चेक भरणे.
प्रश्न 6.
बँकेतील व्यवहाराविषयी पाच वाक्ये लिहा.
उत्तर:
- बँकेत पैशाचे व्यवहार चालता
- विविध प्रकारची कर्जे, हप्ते भरणे हे प्रामुख्याने तिथे चालते.
- बचतीच्या दृष्टीने बँक महत्त्वाची आहे.
- विविध प्रकारच्या बचत-योजना तिथे चालतात.
- पैसे भरणे – काढणे, किमती व दागिने – वस्तू, कागदपत्रे इ.साठी बँक उपयोगी पडते.
प्रश्न 7.
दिलेल्या अक्षरांपासून सुरू होणारे शब्द लिहा.
उत्तरः
पैशांचे व्यवहार Summary in Marathi
पाठ्यपरिचय:
‘पैशांचे व्यवहार’ या पाठात पैशांचा व्यवहार कुठे कुठे केला जातो, ते चित्ररूपाने दाखवले आहे.