Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 5 डराव डराव
Maharashtra Board Class 5 Marathi Solutions Chapter 5 डराव डराव
Maharashtra State Board Class 5 Marathi Sulabhbharati Solutions Chapter 5 डराव डराव
5th Standard Marathi Digest Chapter 5 डराव डराव Textbook Questions and Answers
1. एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न (अ)
डराव डराव आवाज कोण करीत आहे?
उत्तर:
डराव डराव आवाज बेडूक करीत आहे.
प्रश्न (आ)
तलाव का भरला?
उत्तर:
धो धो पाऊस पडल्यामुळे तलाव तुडुंब भरला.
प्रश्न (इ)
बेडकाचे डोळे कसे आहे?
उत्तर:
बेडकाचे डोळे बटबटीत आहे.
2. जोड्या जुळवा.
प्रश्न 1.
जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1.जोराचा पाऊस | (अ) गाठा अपुला गाव |
2. बेडकाचे मोठे डोळे | (आ) धो-धो पाऊस |
3. पूर्ण भरलेला तलाव | (इ) बटबटीत डोळे |
4. स्वत:च्या गावी परत जा | (ई) तुडुंब भरला तलाव |
उत्तर:
‘अ’ गट | ‘ब’ गट |
1.जोराचा पाऊस | (आ) धो-धो पाऊस |
2. बेडकाचे मोठे डोळे | (इ) बटबटीत डोळे |
3. पूर्ण भरलेला तलाव | (ई) तुडुंब भरला तलाव |
4. स्वत:च्या गावी परत जा | (अ) गाठा अपुला गाव |
3. गोलातील शब्द वाचा. चित्रे ओळखा. त्यांच्या योग्य जोड्या जुळवा.
प्रश्न 1.
गोलातील शब्द वाचा. चित्रे ओळखा. त्यांच्या योग्य जोड्या जुळवा.
उत्तर:
- छन्छन्
- छुमछुम्
- ढमढम्
- घणघण्
- कड्कड्
- खळखळ्
- किणकिण्
4. पाण्यातून प्रवास करण्यासाठी कोणकोणती साधने वापरतात?
प्रश्न 1.
पाण्यातून प्रवास करण्यासाठी कोणकोणती साधने वापरतात?
उत्तरः
पाण्यातून प्रवास करण्यासाठी होडी, जहाज, बोट ही साधने वापरतात.
5. पावसात भिजू नये, यासाठी तुम्ही काय काय वापरता?
प्रश्न 1.
पावसात भिजू नये, यासाठी तुम्ही काय काय वापरता?
उत्तर:
पावसात भिजू नये, यासाठी आम्ही छत्री, रेनकोट, रेनशिटर वापरतो.
6. निरीक्षण करा. आवाज सांगा व लिहा.
प्रश्न 1.
निरीक्षण करा. आवाज सांगा व लिहा.
(अ) वाऱ्याने हालणाऱ्या झाडांच्या पानांचा आवाज
(आ) उडायला सुरुवात करताना पक्ष्यांच्या पंखांचा आवाज
(इ) तापलेल्या तेलातील मोहरीचा आवाज
उत्तर:
(अ) सळसळ
(आ) फडफडाट
(इ) तडतड
7. छत्रीचे चित्र काढा. रंगवा.
प्रश्न 1.
वाचा. लक्षात ठेवा.
‘नाव’ हा शब्द या कवितेत दोन अर्थांनी आला आहे.
नाव – वस्तू, व्यक्ती, प्राणी, पक्षी यांना दिलेले विशिष्ट नाव.
नाव – होडी.
Marathi Sulabhbharati Class 5 Solutions Chapter 5 डराव डराव Additional Important Questions and Answers
प्रश्न 1.
खालील प्रश्नांची उत्तरे एक किंवा दोन शब्दात लिहा.
- बेडकाचा आवाज कसा आहे?
- बेडकाचा पत्ता कधी नव्हता?
- पाऊस कसा पडला?
- पाऊस किती पडला?
- तलाव कसा भरला?
- बेडकाचे डोळे कसे आहेत?
- मुलीच्या हातात काय दिसत आहे?
- बेडूक कुठे बसला आहे?
उत्तरः
- डराव डराव
- कालपर्यंत
- धो धो
- फार
- तुडुंब
- बटबटीत
- कागदाची होडी
- मोठ्या दगडावर
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
प्रश्न 1.
डराव डराव आवाज कोण करीत आहे?
उत्तर:
डराव डराव आवाज बेडूक करीत आहे.
प्रश्न 2.
बेडकाला नाव कोण विचारत होते?
उत्तर:
बेडकाला नाव कवितेतील मुलगी विचारत होती.
प्रश्न 3.
मुलगी बेडकाला काय सल्ला देत आहे?
उत्तर:
मुलगी बेडकाला ‘जा, गाठा जा, अपुला गाव’ असा सल्ला देत आहे.
प्रश्न 4.
‘डराव डराव’ या कवितेचे कवी कोण आहेत?
उत्तर:
‘डराव डराव’ या कवितेचे कवी ‘ग. ह. पाटील’ आहेत.
कवितेच्या ओळी पूर्ण करा.
प्रश्न 1.
धो धो ………………………………..
…………………………
…………………………
………………………………. डराव!
उत्तर:
धो धो पाऊस पडला फार
तुडुंब भरला पहा तलाव.
सुरू जाहली अमुची नाव
आणिक तुमची डराव डराव!
प्रश्न 2.
निरीक्षण करा. आवाज सांगा व लिहा.
- वह्यांची पाने फाडताना होणारा आवाज
- झुकझुक गाडीचा आवाज
- सुतार लाकूड कापताना होणारा आवाज
उत्तर:
- टर्रर……
- झुकझुक
- खर्रखरी
व्याकरण व भाषाभ्यास
प्रश्न 1.
समानार्थी शब्द लिहा.
- बेडूक
- पाऊस
- तलाव
- नाव
- डोळे
- गाव
उत्तर:
- मंडूक
- वर्षा
- जलाशय
- नौका, होडी
- नेत्र, नयन
- खेडे, ग्राम
प्रश्न 2.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
- काल
- फार
- तुमच्या
- घ्या
- गाव
उत्तर:
- आज
- कमी
- आमच्या
- दया
- शहर
प्रश्न 3.
कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा.
- गाव
- तलाव
- राव
उत्तर:
- नाव
- नाव
- डराव
प्रश्न 4.
वचन बदला.
- पत्ता
- नाव
- तलाव
- नाव
- डोळे
- छत्री
- गाव
उत्तर:
- पत्ते
- नावे
- तलाव
- नावा
- डोळा
- छत्र्या
- गावे
प्रश्न 5.
एकाच उच्चाराचे पण भिन्न अर्थाचे शब्द लिहा.
- नाव – (Name) , नाव – बोट (Boat)
- सूत – धागा (Thread) , सुत – मुलगा (son)
- दिन – दिवस – (a day) , दीन – गरीब – (poor)
- रवी – सूर्य – (Sun) , रवी – घुसळण्याचे साधन (a churner)
डराव डराव Summary in Marathi
पदयपरिचय:
पावसाळ्याच्या दिवसात बेडकाचे डराव-डराव ओरडणे सुरू होते. बेडूक आणि लहान मुलगी यांच्यातील पावसातील काल्पनिक संवादाचे वर्णन कवी ‘ग. ह. पाटील’ यांनी ‘डराव डराव!’ या कवितेत केले आहे.
शब्दार्थ:
- डराव – बेडकाचा आवाज (frog sound)
- ओरडणे – मोठ्याने बोलणे (To shout)
- फार – अतिशय मोठ्या प्रमाणात (exceedingly)
- तुडुंब – काठोकाठ (full of)
- तलाव – तळे (Pond)
- जाहली – झाली
- नाव – होडी (Boat)
- आणिक – आणि (and)
- बटबटीत – मोठाले, विद्रूप (very big eyes)
- ध्यान – विशिष्ट रूप (particular look)
- विचित्र – साधारण नसलेले (uncommon)
- छत्री – (umbrella)
- गाठणे – पोहचणे (to reach)
- थांबवणे – (to stop)
- अपुला – आपला, स्वतःचा (Our own)