Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 5 सुगरणीचे घरटे
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 5 सुगरणीचे घरटे
Maharashtra State Board Class 6 Marathi Solutions Chapter 5 सुगरणीचे घरटे
Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 5 सुगरणीचे घरटे Textbook Questions and Answers
1. एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
प्रश्न अ.
सुगरण पक्षी घरटे कशापासून बनवतो?
उत्तर:
गवताच्या बारीक, चिवट काड्या.
प्रश्न आ.
सुगरण पक्षी घरटे कुठे बांधतो?
उत्तर:
निंब, बाभळीच्या झाडावर.
प्रश्न इ.
सुगरण पक्ष्याचा महत्त्वाचा गुण कोणता?
उत्तर:
कष्टाळूवृत्ती
2. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
प्रश्न अ.
सुगरण पक्षी सुबक वीण कशाने घालतो?
उत्तर:
सुगरण पक्षी आपल्या चोचीने सुबक वीण घालतो.
प्रश्न आ.
सुगरण पक्ष्याचे हे घरटे वादळात शाबूत का राहते?
उत्तर:
सुगरण पक्ष्याचे घरटे अतिशय मजबूत असते. ते झाडाच्या फांदीला झोक्यासारखे टांगलेले असते. त्यामुळे वादळातही ते शाबूत राहते.
प्रश्न इ.
नयना सुगरण पक्ष्याबद्दल काय म्हणाली?
उत्तर:
नयना सुगरण पक्ष्याबद्दल म्हणाली की, ‘कुठे घाई नाही, गडबड नाही, सगळे कसे नियोजनबद्ध.’
प्रश्न ई.
सुगरण पक्षी कुटुंबवत्सल कसा? ते लिहा.
उत्तर:
सुगरण पक्षी आपल्या सुगरणीसाठी व पिलांसाठी सुरेख घर बांधतो. त्यासाठी अपार मेहनत करतो. म्हणूनच तो
कुटुंबवत्सल आहे.
प्रश्न उ.
सुगरण पक्ष्याला कसबी विणकर का म्हटले आहे?
उत्तर:
सुगरण पक्षी चोचीने आकारबद्ध व नक्षीदार वीण घालून घर बांधतो म्हणून त्याला कसबी विणकर म्हटले आहे.
3. वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.
प्रश्न 1.
वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.
उत्तर:
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(अ) शाबूत राहणे | 2. टिकून राहणे |
(आ) वाखाणणे | 3. स्तुती करणे |
(इ) सर येणे | 1. बरोबरी करणे |
4. खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
प्रश्न 1.
खालील शब्दांचा वाक्यांत उपयोग करा.
उत्तर:
(अ) सुबक – रमाने सुबक रांगोळी काढली.
(आ) कसब – कुंभार कसबीने माठ घडवितो.
(इ) चिकाटी – विदयार्थी चिकाटीने अभ्यास करतात.
(ई) मजबूत – दोरखंड मजबूत असतो.
5. तुम्हांला या पाठातून काय शिकायला मिळाले ते लिहा.
प्रश्न 1.
तुम्हांला या पाठातून काय शिकायला मिळाले ते लिहा.
उत्तर:
1. कष्टाने व चिकाटीने आपण कोणत्याही कामात यश मिळवू शकतो.
2. नीटनेटकेपणाने आपले काम सुबक होते.
6. तुम्ही सुगरण पक्ष्याचे घरटे पाहिले आहे का? त्याचा आकार तुम्हांला कसा वाटला? त्याचे वर्णन करा.
प्रश्न 1.
तुम्ही सुगरण पक्ष्याचे घरटे पाहिले आहे का? त्याचा आकार तुम्हांला कसा वाटला? त्याचे वर्णन करा.
उत्तर:
होय. माळरानात निंबाच्या, बाभळीच्या झाडाला लटकलेली सुगरण पक्ष्याची घरटी पाहिली आहेत. मला त्याचा आकार खेळण्याच्या पत्त्यांमधील इस्पीकसारखा वाटला. नक्षीदार वीणकाम असलेले हे घरटे सुबक, मजबूत व वादळातही टिकणारे असते. ‘बाया’ नावाचा पक्षीच कसबीने हे घरटे तयार करतो. म्हणून त्याला ‘सुगरण’ म्हणतात.
7. खाली काही शब्द दिलेले आहेत, त्यापैकी सुगरण पक्ष्याला लागू होणारे शब्द शोधून आकृती पूर्ण करा.
नीटनेटका, चिकाटी, आळशी, जबाबदार, सहनशील, कष्टाळू, स्तुतीप्रिय, निर्दयी, झोपाळू
प्रश्न 1.
खाली काही शब्द दिलेले आहेत, त्यापैकी सुगरण पक्ष्याला लागू होणारे शब्द शोधून आकृती पूर्ण करा.
नीटनेटका, चिकाटी, आळशी, जबाबदार, सहनशील, कष्टाळू, स्तुतीप्रिय, निर्दयी, झोपाळू
उत्तर:
8. सुगरण पक्ष्याप्रमाणे तुमच्यात जर चिकाटी असेल, तर कोणकोणती कामे तुम्ही चांगली करू शकाल ते सांगा.
उपक्रम: तुम्ही पाहिलेले पक्षी व त्यांची घरटी यांची चित्रे गोळा करून एका मोठ्या कागदावर चिकटवा. त्याखाली त्यांची नावे लिहून तक्ता तयार करा.
खालील वाक्ये वाचा.
जेव्हा आपण एखादया शब्दाच्या आधी ‘तो’ लावतो तेव्हा तो पुल्लिंगी शब्द, ‘ती’ लावतो तेव्हा स्त्रीलिंगी शब्द, ‘ते’ लावतो तेव्हा नपुंसकलिंगी शब्द म्हणतो.
आणखी काही उदाहरणे वाचा. वाक्ये लिहिताना त्याप्रमाणे लिहा.
आपण समजून घेऊया.
मीना हुशार मुलगी आहे. मीनाच्या भावाचे नाव मिहीर आहे. मीना मिहीरला ‘दादा’ म्हणते. मिहीर मीनाला ‘ताई’ म्हणतो. मीना आणि मिहीर एकाच शाळेत शिकतात. मीना आणि मिहीर यांच्यात कधीच भांडणे होत नाहीत. मीना मोठी असल्याने मीना मिहीरची काळजी घेते.
वरील परिच्छेदात मीना आणि मिहीर या भावंडांचे वर्णन आले आहे. मीना व मिहीर या शब्दांऐवजी दुसरे शब्द वापरून तयार केलेला पुढील परिच्छेद वाचा.
मीना हुशार मुलगी आहे. तिच्या भावाचे नाव मिहीर आहे. ती त्याला ‘दादा’ म्हणते. तो तिला ‘ताई’ म्हणतो. ते एकाच शाळेत शिकतात. त्यांच्यामध्ये कधीच भांडणे होत नाहीत. ती मोठी असल्याने त्याची काळजी घेते.
मीना आणि मिहीर या नामांऐवजी आपण येथे तिच्या, ती, त्याला, तो, तिला, ते, त्यांच्या, ती, त्याची असे शब्द वापरले आहेत.
या शब्दांना सर्वनाम म्हणतात. नामाऐवजी आपण जो शब्द वापरतो, त्या शब्दास सर्वनाम म्हणतात.
खालील वाक्यातील सर्वनामे अधोरेखित करा.
(अ) मी कुमारला हाक मारली.
(आ) तुला नवीन दप्तर आणले.
(इ) त्याचा फोटो छान येतो.
(ई) मी त्यांना सुविचार सांगितला.
(उ) त्याने घर झाडून घेतले.
(ऊ) आपण पतंग उडवूया.
खालील परिच्छेद वाचा व त्यातील सर्वनामे अधोरेखित करा.
प्रश्न 1.
सुगरण पक्ष्याप्रमाणे तुमच्यात जर चिकाटी असेल, तर कोणकोणती कामे तुम्ही चांगली करू शकाल ते सांगा.
उत्तर:
प्रश्न 2.
खालील वाक्यातील सर्वनामे अधोरेखित करा.
प्रश्न अ.
मी कुमारला हाक मारली.
उत्तर:
मी कुमारला हाक मारली.
प्रश्न आ.
तुला नवीन दप्तर आणले.
उत्तर:
तुला नवीन दप्तर आणले.
प्रश्न इ.
त्याचा फोटो छान येतो.
उत्तर:
त्याचा फोटो छान येतो.
प्रश्न ई.
मी त्यांना सुविचार सांगितला.
उत्तर:
मी त्यांना सुविचार सांगितला.
प्रश्न उ.
त्याने घर झाडून घेतले.
उत्तर:
त्याने घर झाडून घेतले.
प्रश्न ऊ.
आपण पतंग उडवूया.
उत्तर:
आपण पतंग उडवूया.
Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 5 सुगरणीचे घरटे Important Additional Questions and Answers
रिकाम्या जागी जुळणाऱ्या योग्य पर्यायाची निवड करून वाक्य पूर्ण करा.
प्रश्न 1.
……………….. असलेल्या निंबाच्या झाडावर सुगरण पक्षी घरटे बांधत होता.
(अ) शाळेच्या परिसरात
(ब) घराच्या अंगणात
उत्तर:
(अ) शाळेच्या परिसरात
प्रश्न 2.
मुले घरटे पाहत असताना ……………….. तिथे आले.
(अ) पक्षी
(ब) गुरुजी
उत्तर:
(ब) गुरुजी
प्रश्न 3.
……………….. पाहूनच या पक्ष्याला ‘सुगरण’ असे म्हणतात.
(अ) स्वयंपाकाचे कसब
(ब) नक्षीदार वीण
उत्तर:
(ब) नक्षीदार वीण
प्रश्न 4.
……………….. हे घरटे शाबूत राहते.
(अ) वादळातही
(ब) उन्हाळ्यातही
उत्तर:
(अ) वादळातही
प्रश्न 5.
किती ……………….. आहे हा पक्षी!
(अ) अपार आळशी
(ब) कसबी विणकर
उत्तर:
(ब) कसबी विणकर
एक-दोन शब्दांत उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
नयनाला सुगरण पक्ष्याच्या कामातील काय काय आवडायचे?
उत्तरः
सफाईदारपणा, नीटनेटकेपणा
प्रश्न 2.
घरट्याचे निरीक्षण कोण करते?
उत्तर:
सुगरणमादी
खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
मुलांनी गुरुजींना काय दाखविले?
उत्तर:
मुलांनी गुरुजींना सुगरणीचे घरटे दाखविले.
प्रश्न 2.
घरटे पाहण्यासाठी कोण कोण थांबायचे?
उत्तर:
अतुल, नयना, जॉन व सिमरन घरटे पाहण्यासाठी थांबायचे.
खालील प्रश्नांची दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
सुगरण पक्ष्याबद्दल सिमरनला काय वाटायचे?
उत्तर:
सिमरनला सुगरण पक्ष्याबद्दल वाटायचे की, हा पक्षी सुगरणीसाठी व पिलांसाठी सुरेख घर बांधतो. त्यासाठी तो अपार मेहनत घेतो. हा खूप जबाबदार व कुटुंबवत्सल पक्षी आहे.
प्रश्न 2.
नयनाला सुगरण पक्ष्याचे कौतुक का वाटते?
उत्तर:
सुगरण पक्षी आकारबद्ध घरटे बांधतो, तेही चोचीने. तो कसबी विणकर आहे. आपल्यालाही असे घरटे तयार करता येईल का? असा प्रश्न नयनाला पडतो आणि म्हणूनच तिला सुगरण पक्ष्याचे कौतुक वाटते.
प्रश्न 3.
गुरुजींनी सुगरण पक्ष्याविषयी कोणती माहिती दिली?
उत्तर:
सुगरण पक्षी नीटनेटके आणि मजबूत घरटे बांधतो. गवताच्या बारीक पण चिवट काड्यांनी तो सुबक, नक्षीदार घरटे बांधतो. नक्षीदार वीण पाहूनच या पक्ष्याला ‘सुगरण’ असे म्हणतात. सुगरण मादी त्या घरट्याचे निरीक्षण करते व मजबूत घरटे पसंत करते. निंब, बाभळीच्या झाडाच्या फांदीला हे घरटे झोक्यासारखे टांगलेले असते. वादळातही हे घरटे शाबूत असते. या घरट्याची सर कोणत्याही इतर पक्ष्याच्या घरट्याला येणार नाही.
व्याकरण व भाषाभ्यास :
सर्वनाम : नामाऐवजी येणाऱ्या शब्दास म्हणतात.
जसे की – तो, ती, ते, त्याला इ.
खालील वाक्यातील सर्वनामे अधोरेखित करा.
प्रश्न 1.
तिने नवीन घर घेतले.
उत्तर:
तिने नवीन घर घेतले.
प्रश्न 2.
ते पावसात भिजले.
उत्तर:
ते पावसात भिजले.
प्रश्न 3.
लिंग ओळखा.
ससा, झाड, तलवार, कॅमेरा, पेला, पिशवी, पुस्तक, उशी, औषध.
उत्तर:
- पुल्लिंग – ससा, कॅमेरा, पेला
- स्त्रीलिंग – तलवार, पिशवी, उशी
- नपुंसकलिंग – झाड, पुस्तक, औषध
प्रश्न 4.
खालील शब्दांचा वाक्यांत उपयोग करा.
उत्तर:
- निरीक्षण – सलीम अली पक्ष्यांचे निरीक्षण करीत.
- नीटनेटके – आईचे काम नीटनेटके आहे.
- घरटे – कोकीळ पक्षी घरटे बांधत नाही.
- नियोजनबद्ध – कोणतेही काम नियोजनबद्ध हवे.
- मोहून टाकणे – श्रीकृष्णाच्या चित्राने माझे मन मोहून टाकले.
सुगरणीचे घरटे Summary in Marathi
पाठपरिचयः
प्रस्तुत पाठात सुगरण पक्ष्याच्या घरट्याचे वर्णन केले आहे. सुगरणपक्षी अत्यंत मेहनतीने, चिकाटीने घर बांधतो. सुगरणमादी घराची मजबूती पारखते व मगच घर पसंत करते. सुगरणपक्षी कुटुंबवत्सल व कष्टाळू आहे. त्याचे घर बांधण्याचे कसब पाहून मन थक्क होते.
शब्दर्थ:
- निरीक्षण – अवलोकन (observation)
- हालचाल – हालणे (movement)
- नियोजनबद्ध – आखीवरेखीव (planned)
- सफाईदार – व्यवस्थित (cleanliness)
- कष्टाळू – कष्ट करण्याची प्रवृत्ती (hard work)
- चिकाटी – अथक परिश्रम (perseverance)
- सुबक – सुंदर (beautiful)
- अपार – खूप (very much)
- मजबूत – पक्के (tight)
- शाबूत राहणे – टिकून राहणे (sustain)
- कसब – कौशल्य (skill)
- विणकाम – धागे एकमेकांत गुंफणे (weaving)
वाक्प्रचार व अर्थ:
- सर येणे – बरोबरी करणे.
- वाखाणणी करणे – स्तुती करणे.