Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर
Maharashtra Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर
Maharashtra State Board Class 6 Marathi Solutions Chapter 9 घर (कविता)
Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 9 घर Textbook Questions and Answers
1. एक – दोन वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न अ
माणसाची पहिली शाळा कुठे सुरू होते?
उत्तर:
माणसाची पहिली शाळा घरात सुरू होते.
प्रश्न आ
घराने कोणत्या गोष्टी जवळ कराव्यात?
उत्तर:
घराने नवी मूल्ये व नवीन ज्ञान जवळ करावे.
प्रश्न इ
आईच्या हातचे जेवण कसे असते?
उत्तर:
आईच्या हातचे जेवण चविष्ट असते.
2. कवीने घराचे वर्णन कोणत्या शब्दांत केले आहे ते लिहा.
प्रश्न 1.
कवीने घराचे वर्णन कोणत्या शब्दांत केले आहे ते लिहा.
उत्तर:
घर म्हणजे नुसते दगड, विटा, सिमेंटपासून बनवलेल्या चार भिंतीने तयार केलेली वस्तू नसून ती एक सुंदर कलाकृती असते. ती एक आनंदी वास्तू असते. घरात फक्त वेगवेगळ्या खोल्या असून चालत नाही तर घर म्हणजे जिव्हाळा व प्रेमाने भरलेल्या ओल्या भावना असते. घरातच आपण शिक्षणाच्या पहिल्या शाळेत शिकत असतो. घर म्हणजे फक्त पसारा किंवा केवळ निवारा नसून त्याला स्वत:चा असा एक चेहरा व कहाणी असते. घराला स्वत:ची अशी एक ओळख असते.
घरापासूनच आपण पाहायला, चालायला, धावायला, लढायला व दुःखाचे डोंगर चढायला शिकतो. घराने सतत सावधान व समाधानी असावे. घराने सतत काळाचे भान ठेवावे. त्याने नवीन-नवीन मूल्य स्विकारावीत व नवीननवीन ज्ञान आत्मसात करावे. घरात आई अपार कष्ट करत असते. आजी सतत घरातल्या लहानग्या मुलांना गोष्टी सांगते तर आजोबा सतत सर्वांशी गप्पा मारत असतात. घरी आई जे सर्वांसाठी जेवण बनविते ते अतिशय चविष्ट व रूचकर असते. अशा प्रकारे कवी ‘धुंडिराज जोशी’ यांनी घराचे वर्णन केले आहे.
3. खालील आकृती पूर्ण करा.
3. शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधून लिहा.
वस्तू, खोल्या, जिव्हाळा, पसारा, पाहायला, सावधान, भान, गोष्ट, चविष्ट
प्रश्न 1.
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधून लिहा.
वस्तू, खोल्या, जिव्हाळा, पसारा, पाहायला, सावधान, भान, गोष्ट, चविष्ट
उत्तर:
- वस्तू – वास्तू
- खोल्या – ओल्या
- जिव्हाळा – शाळा
- पसारा – निवारा
- पाहायला – चालायला
- लढायला – चढायला
- सावधान – समाधान
- भान – ज्ञान
- गोष्ट – कष्ट
- चविष्ट – गप्पिष्ट
4. योग्य पर्याय निवडून लिहा.
प्रश्न अ.
घरात हव्या भावना ओल्या – म्हणजे
(अ) घरातील व्यक्तींनी रडावे
(आ) घरातील व्यक्तींनी परस्परांवर प्रेम करावे.
(इ) घरातील व्यक्तीत एक व्यक्ती भावना नावाची असावी.
उत्तर:
(आ) घरातील व्यक्तींनी परस्परांवर प्रेम करावे.
प्रश्न ब.
घर शिक्षणाची पहिली शाळा – म्हणजे
(अ) घरामध्ये बालमंदिर भरते.
(आ) घरापासून शिक्षणाला सुरूवात होते.
(इ) घराच्या शाळेत नाव घातले जाते.
उत्तर:
(आ) घरापासून शिक्षणाला सुरूवात होते.
प्रश्न क.
जवळ करावीत नवी मूल्ये नवीन ज्ञान – म्हणजे
(अ) नवी मूल्ये व नवीन ज्ञानाच्या जवळ राहायला जावे.
(आ) रोज नवीन मूल्यांची व ज्ञानाची पुस्तके वाचावीत.
(इ) काळानुसार मूल्य व ज्ञानातील बदल स्वीकारावे.
उत्तर:
(आ) रोज नवीन मूल्यांची व ज्ञानाची पुस्तके वाचावीत.
5. तुमच्या परिसरातील घराला दिलेली नावे पाहा. यादी करा.
प्रश्न 1.
तुमच्या परिसरातील घराला दिलेली नावे पाहा. यादी करा.
उत्तर:
- मातृछाया
- गोकुळधाम
- शांतीनिवास
- कृष्णकुंज
- गीताई
- ग्रीनव्हिला
- दिपांजली
- शिवसदन
- राधाकृष्णनिवास
- मातोश्री
- सह्याद्री व्हिला
- मनःस्मृती
- केशवधाम
- शांतनुनिवास
- वृंदावन
- उत्कर्ष
6. खालील शब्द व त्यांचे अर्थ लक्षात ठेवा.
प्रश्न 1.
खालील शब्द व त्यांचे अर्थ लक्षात ठेवा.
उत्तर:
- चविष्ट – चव असणारे
- विशिष्ट – ठरावीक प्रकारचा
- भ्रमिष्ट – भ्रम झालेला
- गप्पिष्ट – गप्पा मारणारा
- कोपिष्ट – रागावलेला
- अनिष्ट – योग्य नसलेले
7. खालील शब्दांचे लिंग ओळखा व वचन बदला.
प्रश्न 1.
खालील शब्दांचे लिंग ओळखा व वचन बदला.
उत्तर:
शब्द | लिंग | वचन |
1. घर | नपुंसकलिंगी | घरे |
2. भिंत | स्त्रीलिंगी | भिंती |
3. चेहरा | पुल्लिंगी | चेहरे |
4. निवारा | पुल्लिंगी | निवारे |
5. आई | स्त्रीलिंगी | आया |
6. डोंगर | पुल्लिंगी | डोंगर |
7. हवा | स्त्रीलिंगी | हवा |
8. आजोबा | नपुंसकलिंगी | आजोबा |
8. खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
9. खालील शब्द वाचा लिहा.
10. वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दांचे अर्थ शोधा. लिहा. उदा., वस्तू – जिन्नस, नग वास्तू – घर
कप – काप, तार – तारा, खरे – खारे, गर – गार, घर – घार, चार – चारा, पर – पार, वर – वार
प्रश्न 1.
कप – काप
उत्तर:
प्रश्न 2.
तार – तारा
उत्तर:
प्रश्न 3.
खरे – खारे
उत्तर:
प्रश्न 4.
गर – गार
उत्तर:
प्रश्न 5.
घर – घार
उत्तर:
प्रश्न 6.
चार – चारा
उत्तर:
प्रश्न 7.
पर – पार
उत्तर:
प्रश्न 8.
वर – वार
उत्तर:
11. तुमच्या घराचे चित्र काढून रंगवा व त्यांचे सहा सात वाक्यांत वर्णन करा.
प्रश्न अ.
तुमच्या घराचे चित्र काढून रंगवा व त्यांचे सहा सात वाक्यांत वर्णन करा.
उत्तर:
माझ्या घराचे नाव ‘गोकुळधाम’ आहे. माझ्या घरात मी, माझे आई-बाबा व मोठी ताई असे चार जण राहतो. माझी आई घरातील सर्व कामे करते. माझे बाबा शेताची सर्व कामे करतात. मी व ताई आम्ही रोज शाळेत जातो व अभ्यास करतो. माझ्या घराभोवती विविध प्रकारची झाडे आहेत. माझ्या घरासमोरून एक नदी वाहते. तिचे पाणी स्वच्छ व चवदार आहे. माझे घर म्हणजे फक्त दगड व माती पासून बनवलेल्या भिंती नसून त्यात एक प्रकारचा जिव्हाळा आहे.
प्रश्न आ.
चित्राच्या जागी योग्य शब्दाचा वापर करून खालील म्हणी पूर्ण करा.
उत्तर:
उत्तर:
अडला हरी गाढवाचे पाय धरी.
प्रश्न इ.
खालील चित्रांच्या सहसंबंध लावून गोष्ट तयार करा.
उत्तर:
काही मुले स्वच्छंदी मनाची असतात. माझे मनही तसेच आहे. मी एके दिवशी क्रिकेटचे सामान घेऊन मोकळ्या माळरानावर खेळायला गेलो होतो. तिथे गेल्यावर मी काही फुलपाखरे पाहिली. ती त्या माळावर स्वच्छंदी उडत होती. बागडत होती. त्यांच्या पंखावरील विविध रंग पाहून मी आश्चर्यचकितच झालो. निसर्ग ही रंगांची किमया कशी साधतो ते मला कळेना. त्याच मोकळ्या माळावर काही मुले पतंग उडवताना दिसली. त्यांचे त्या पतंगांचे विविध रंग पाहून मलाही पतंग उडवण्याचा मोह झाला आणि मी क्रिकेट सोडून पतंग उडवण्यात गुंग झालो.
Marathi Sulabhbharti Class 6 Solutions Chapter 9 घर Important Additional Questions and Answers
खालील पदयपंक्तींच्या रिकाम्या जागा भरून ओळी पूर्ण करा.
प्रश्न 1.
- घर नाही चार …………….. घर असते देखण्या ……………..
- घर नाही एक……………… .घर म्हणजे आनंदी …………….. .
- घर नाही नुसत्या ……………. घरात हव्या भावना …………….. .
- घरात हवा ………………., घर शिक्षणाची पहिली …………….. .
- घर नाही पसारा, घर नाही ………………… निवारा.
- घराला असते …………….., घराला असतो आपला .
- घराने असावे …………….. घराने द्यावे …………….. .
- घराने ठेवावे …………….. भान, जवळ करावीत नवी …………….. नवीन ……………….
- घरात आईचे अपार …………….. ,आजी सांगते ……………… गोष्ट,
- घरात आजोबा …………….. , आईच्या हातचे जेवण …………….. .
उत्तर:
- भिंती, कृती
- वस्तू, वास्तू
- खोल्या, ओल्या
- जिव्हाळा, शाळा
- नुसता, केवळ
- कहाणी, चेहरा
- सावधान, समाधान
- काळाचे, मूल्ये, ज्ञान
- कष्ट, सुंदर
- गप्पिष्ट, चविष्ट
खालील प्रश्नांची एक ते दोन वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
घर कसल्या कृती असते?
उत्तर:
घर देखण्या कृती असते.
प्रश्न 2.
घर म्हणजे कशी वास्तू असते?
उत्तर:
घर म्हणजे आनंदी वास्तू असते..
प्रश्न 3.
घरात कशा भावना हव्यात?
उत्तर:
घरात ओल्या भावना हव्यात.
प्रश्न 4.
घराला स्वत:चा असा काय असतो?
उत्तर:
घराला स्वत:चा असा आपला चेहरा असतो.
प्रश्न 5.
घर काय काय शिकवते?
उत्तर:
घर पाहायला, चालायला, धावायला, लढायला, दुःखाचा डोंगर चढायला शिकवते.
प्रश्न 7.
घराने कशाचे भान ठेवावे?
उत्तर:
घराने काळाचे भान ठेवावे.
प्रश्न 8.
घरात अपार कष्ट कोण करते?
उत्तर:
घरात अपार कष्ट आई करते.
प्रश्न 9.
घरात सुंदर गोष्ट कोण सांगते?
उत्तर:
घरात सुंदर गोष्ट आजी सांगते.
प्रश्न 10.
घरात गप्पा करणारे कोण आहेत?
उत्तर:
घरात आजोबा गप्पा करणारे आहेत.
व्याकरण व भाषाभ्यास
प्रश्न 1.
समानार्थी शब्द लिहा.
- घर
- जिव्हाळा
- पहिली
- शाळा
- कहाणी
- चेहरा
- डोंगर
- काळ
- मूल्ये
- कष्ट ङ्के
उत्तर:
- सदन, पास्त, निवास
- प्रेम
- प्रथम
- विद्यालय
- गोष्ट, कथा
- तोंड, वदन
- पर्वत
- वेळ
- आदर्श
- परिश्रम
प्रश्न 5.
विरूद्धार्थी शब्द लिहा.
- देखणा
- एक
- आनंद
- ओल्या
- जिव्हाळा
- पहिली
- असते
- ज्ञान
- सुंदर
- आजी
- जवळ
उत्तर:
- विद्रुप
- अनेक
- दु:ख
- सुक्या
- द्वेष, मत्सर
- शेवटची
- नसते
- अज्ञान
- कुरूप
- आजोबा
- दूर
प्रश्न 6.
खालील शब्दांचे वचन बदला,
- घर
- भिंत
- खोली
- ओली
- शाळा
- निवारा
- कहाणी
- चेहरा
- मूल्य
- गोष्ट
उत्तर:
- घरे
- भिंती
- खोल्या
- ओल्या
- शाळा
- निवारे
- कहाण्या
- चेहरे
- मूल्ये
- गोष्टी
प्रश्न 2.
खालील वेब पूर्ण करा.
उत्तर:
1.
2.
खालील शब्द व त्यांचे अर्थ लक्षात ठेवा.
प्रश्न 1.
खालील शब्द व त्यांचे अर्थ लक्षात ठेवा.
उत्तर:
- नादिष्ट – छंद असणारा
- गर्विष्ट – गर्व असणारा
- कनिष्ट – लहान असणारा
- वरिष्ट – मोठा असणारा
- इष्ट – चांगले
चित्राच्या जागी योग्य शब्दाचा वापर करून खालील म्हणी पूर्ण करा.
प्रश्न 1.
उत्तरः
हातच्या कंकणाला आरसा कशाला.
प्रश्न 2.
नाकापेक्षा जड
उत्तर:
नाकापेक्षा मोती जड.
घर Summary in Marathi
काव्य परिचयः
‘घर’ या कवितेत धुंडिराज जोशी यांना घर म्हणजे केवळ चार भिंती नसून त्यापलिकडेही बरेच काही असल्याचा विचार मांडला आहे. घर एक आनंदी वास्तू असून त्या घराशी जिव्हाळा, अनके भावना निगडित असतात. हे घरच आपल्याला अनेक गोष्टी शिकवते, आपल्याला समाधान देते. याच घरात आजी, आजोबा या सगळ्यांच्या आठवणीदेखील सामावलेल्या असतात. घरासंबंधीचे फार सुंदर विचार या कवितेत मांडले आहेत.
शब्दार्थ:
- घर – निवास, निवारा (house)
- भिंत – तट (wall)
- देखण्या – सुंदर (beautiful)
- कृती – काम (work)
- वस्तू – (things)
- वास्तू – इमारत (building)
- नुसत्या – फक्त, केवळ (only)
- खोली – (room)
- हव्या – पाहिजेत (want)
- ओल्या भावना – प्रेमळ भावना (loving feelings)
- जिव्हाळा – आत्मीयता (attachment)
- पहिली – प्रथम (first)
- शाळा – विद्यालय (school)
- नुसता – फक्त, केवळ (only)
- निवारा – आसरा (shelter)
- कहाणी – गोष्ट, कथा (story)
- चेहरा – मुखवटा, तोंड (face)
- डोंगर – पर्वत (mountain)
- चढायला – (toclimb)
- सावधान – जागृत (to alert, vigilant)
- ठेवावे – मांडणे (to keep)
- काळ – समय (period, time)
- भान – जाणीव (consciousnest)
- नवी – नवीन (new)
- मूल्ये – किंमत (value)
- ज्ञान – माहिती (knowledge)
- अपार – खूप, जास्त (to much)
- कष्ट – परिश्रम (hard work)
- आजी – (grandmother)
- सुंदर – छान (lovely)
- आजोबा – (grandfather)
- सांगते – (to tell) बोलणे
- गप्पिष्ट – गप्पा करणारे (talkative, chatter)
- चविष्ट – रूचकर, चवदार (tasty, delicious)