Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 1 प्रार्थना
Maharashtra Board Class 7 Marathi Solutions Chapter 1 प्रार्थना
Maharashtra State Board Class 7 Marathi Solutions Chapter 1 प्रार्थना
Marathi Sulabhbharti Class 7 Solutions Chapter 1 प्रार्थना Textbook Questions and Answers
रिकाम्या जागा भरा.
प्रश्न 1.
- नमस्कार माझा या ………………. .
- शब्दरूप …………… दे …………… भक्ती दे.
- …………………. दे अम्हांस एक ………………, एक ध्यास.
- होऊ आम्ही …………… कलागुणी
- ………………. कळस जाय उंच अंबरा।।
उत्तरः
- ज्ञानमंदिरा
- शक्ती, भावरूप
- विदयाधन, छंद’
- नीतिमंत, बुद्धिमंत
- कीर्तिचा
प्रश्न 2.
जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गटी |
1. शब्दरूप | (अ) भक्ती |
2. भावरूप | (ब) शक्ती |
3. प्रगतीचे | (क) कळस |
4. कीर्तिचा | (ड) पंख |
उत्तरः
‘अ’ गट | ‘ब’ गटी |
1. शब्दरूप | (ब) शक्ती |
2. भावरूप | (अ) भक्ती |
3. प्रगतीचे | (ड) पंख |
4. कीर्तिचा | (क) कळस |
खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
प्रश्न 1.
प्रार्थना या कवितेचे कवी कोण आहेत?
उत्तर:
‘प्रार्थना’ या कवितेचे कवी ‘जगदीश खेबूडकर’ हे आहेत.
प्रश्न 2.
जगदीश खेबूडकर यांनी कशासाठी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केले आहे?
उत्तर:
जगदीश खेबूडकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीसाठी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केले आहे.
प्रश्न 3.
मुले कोणाला नमस्कार करीत आहेत?
उत्तरः
मुले ज्ञानमंदिराला (शाळेला) नमस्कार करीत आहेत.
प्रश्न 4.
प्रार्थनेतून कोणती शक्ती विद्यार्थी मागत आहेत?
उत्तरः
प्रार्थनतून शब्दरूप शक्ती विदयार्थी मागत आहेत.
प्रश्न 5.
कोणते पंख देण्याची विदयार्थी विनंती करत आहेत?
उत्तर:
प्रगतीचे पंख देण्याची विद्यार्थी विनंती करत आहेत.
प्रश्न 6.
चिमणपाखरे कोणाला म्हटले आहे?
उत्तरः
चिमणपाखरे विदयार्थ्यांना म्हटले आहे.
प्रश्न 7.
कोणत्या गोष्टीचा ध्यास व छंद जडावा, अशी प्रार्थना विद्यार्थी करत आहेत?
उत्तर:
विदयाधनाचा ध्यास व छंद जडावा, अशी प्रार्थना विद्यार्थी करत आहेत.
प्रश्न 8.
आम्ही कसे होऊ, अशी विदयार्थी प्रार्थना करत आहेत?
उत्तरः
आम्ही नीतिमंत, कलागुणी, बुद्धिमंत होऊ अशी विदयार्थी प्रार्थना करत आहेत.
प्रश्न 9.
कीर्तिचा कळस कोठे जाणार आहे?
उत्तरः
कीर्तिचा कळस उंच अंबरात जाणार आहे.
खालील कवितेच्या ओळींचा अर्थ स्पष्ट करा.
प्रश्न 1.
विदयाधन दे अम्हांस
एक छंद एक ध्यास
नाव नेई पैलतीरी दयासागरा।।
उत्तरः
मुले ईश्वराकडे प्रार्थना करत आहेत की शाळेत आम्हांला विदयाधन मिळू दे हा एकच ध्यास आहे, एकच छंद आहे. हे ईश्वरा, “आम्ही शिकून खूप मोठे होऊ व आमच्या देशाचे नाव जगात सगळीकडे पसरवू.”
व्याकरण व भाषाभ्यास:
प्रश्न 1.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
- नमस्कार
- छंद
- नाव
- अंबर
उत्तर:
- वंदन
- नाद
- होडी
- आकाश
प्रश्न 2.
खालील विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा,
- प्रगती
- कीर्ति
- कळस
- माझा
उत्तरः
- अधोगती
- अपकीर्ति
- पायथा
- तुझा
प्रश्न 3.
कवितेत आलेले यमक जुळणारे शब्द लिहा,
- शक्ती
- नीतिमंत
- सुंदरा
- भावरूप
उत्तर:
- भक्ती
- बुद्धिमंत
- अंबरा
- शब्दरूप
प्रश्न 4.
खालील शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
‘चिमणपाखरा’
उत्तरः
- चिमण
- पाखरा
- खण
- पारा
- चिरा
प्रश्न 5.
‘नमस्कार’ शब्द वापरून दोन वाक्ये लिहा.
उत्तरः
- मी सकाळी उठल्यावर देवाला नमस्कार करतो.
- गुरुजींना नमस्कार करून मी कबड्डीच्या स्पर्धेत उतरलो.
प्रार्थना Summary in Marathi
काव्य परिचयः
प्रस्तुत प्रार्थनेतून शाळेविषयी प्रेम, जिव्हाळा, कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे. प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती. प्रार्थना केवळ मुखाने नव्हे, तर अंत:करणापासून केली पाहिजे.
The poet has expressed love, affection and gratitude towards the school, through this poem. Prayer is the strength to get closer to the God. Prayer should be recited not only by mouth but also from the bottom of the heart.
कवितेचा भावार्थः
ज्ञानरूपी मंदिर असलेल्या आमच्या या शाळेला आमचा नमस्कार आहे. सत्य, शिव व सुंदर अशी मूल्ये जपणारी आमची शाळा आहे. ।। तू आम्हांला शब्दरूपी शक्ती दे. भावपूर्ण भक्ती दे. आम्हां मुलांना, चिमण्यापाखरांना ध्येय गाठण्यासाठी प्रगतीचे पंख दे. ।।1।। तू आम्हांला विदयेचे, ज्ञानाचे धन दे. अभ्यासाचा छंद लागू दे, ओढ लागू दे. ज्ञानाचा ध्यास असू दे. आमची जीवनाची नाव (होडी) यशाच्या पैलतीराला लागू दे. ।।2।। तुझ्या आशिर्वादाने आम्ही सद्वर्तनी होऊ, कलागुण संपन्न होऊ. हुशार, बुद्धिमंत होऊ. आमच्या कीर्तीचा कळस उंच आकाशात जाऊ दे. यश मिळू दे. ।।3।।
शब्दार्थ:
- प्रार्थना – आराधना, नमन – prayer
- नमस्कार – वंदन, नमन, – a reverential आदरपूर्वक केलेले bow, an अभिवादन obeisance
- ज्ञानमंदिर – ज्ञानाचे घर – school
- शक्ती – ताकद, सामर्थ्य – strength
- भक्ती – श्रद्धा, निष्ठा – deep devotion
- प्रगती – विकास – progress
- पंख – पर – a wing
- चिमणपाखरा – लहान मुले – small children
- चिमण – लहान – small
- पाखरू – पक्षी – bird
- धन पैसा, संपत्ती, – money, wealth ऐश्वर्य
- छंद – आवड – hobby, liking
- ध्यास – विशिष्ट गोष्टीचे – constant सतत केलेले चिंतन thinking
- नीतिमंत – सदाचरणी, मूल्य – good conduct, जपणारी virtuous
- नीती – शिष्टाचार, – etiquette सदाचाराचे नियम
- बुद्धिमंत – बुद्धिमान – intelligent
- कीर्ति – नावलौकिक, – fame ख्याती
- कळस – शिखर – the spire
- उंच – उत्तुंग – high
- अंबर – आकाश – the sky
- जाय – जाणे – to go
- नाव – होडी – boat, craft
- पैलतीर – पलीकडचा किनारा – opposite side of the bank of river