Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश
Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश
Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 20.1 विश्वकोश (स्थूलवाचन)
9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 20.1 विश्वकोश Textbook Questions and Answers
1. टिपा लिहा:
प्रश्न 1.
विश्वकोशाचा उपयोग.
उत्तर:
शिक्षणाचा प्रसार खूप झपाट्याने झाला. औदयोगिकीकरणामुळे समाजाच्या वैज्ञानिक व तांत्रिक गरजा वाढल्या. विविध प्रकारचे शब्द अस्तित्वात आले व भाषा समृद्ध झाल्या. त्यामुळे आजच्या यंत्रयुगातील व विज्ञानयुगातील माणसाला आपले ज्ञान विश्वव्यापी व अदययावत करण्यासाठी विश्वकोशाची गरज निर्माण झाली. मानव्यविदया, विज्ञान व तंत्रज्ञान यांतील सर्वसंग्रहित विषयांची माहिती व ज्ञान विश्वकोशात समाविष्ट असते. मुख्य विषय व त्याच्या संलग्न विषयांचे ज्ञान मिळवण्यासाठी विश्वकोशाचा अत्यंत निकडीचा उपयोग आहे.
प्रश्न 2.
विश्वकोशाची निर्मिती प्रक्रिया.
उत्तर:
मानव्यविदया, विज्ञान व तंत्रज्ञान यांतील सर्व विषयांचे अययावत ज्ञान संकलित करण्यासाठी विश्वकोशाची निर्मिती झाली. प्रथम विषयवार तज्ज्ञांच्या समितीची रचना करण्यात आली. प्रत्येक विषयाच्या नोंदीची शीर्षके निश्चित करण्यात आली. नोंदीचे तीन प्रकार करण्यात आले – मुख्य, मध्यम व लहान नोंदी. त्यांतील मुद्द्यांची टाचणे करण्यात आली.
नोंदींच्या मर्यादा आखून टाचणांमध्ये तशा सूचना दिल्या. प्रत्येक विषयातील नोंदींच्या त्यांच्या प्रकारांनुसार यादया तयार करण्यात आल्या. अकारविल्यानुसार या यादया क्रमवार लावण्यात आल्या. अशा प्रकारे 1976 साली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने मराठी विश्वकोशाचा पहिला खंड प्रकाशित केला. आतापर्यंत विश्वकोशाचे अठरा खंड प्रकाशित झाले आहेत.
2. ‘शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते,’ याविषयी तुमचे मत लिहा.
प्रश्न 1.
‘शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते,’ याविषयी तुमचे मत लिहा.
उत्तर:
विविध मासिकांमधून व वर्तमानपत्रांमधून पुरवण्यांच्या द्वारे शब्दकोडी सर्रास दिली जातात. शब्दकोडे सोडवल्यामुळे अनेक जुने-नवे शब्द कळतात. आपली शब्दसंपत्ती वाढते. त्यामुळे बुद्धीत भर पडतेच पण आपल्याला शब्दांच्या अर्थछटा माहीत होऊन आपले ज्ञान वाढते. शब्दसमूहासाठी एक शब्द, एका शब्दांचे भिन्न अर्थ, प्रतिशब्द व विरुद्धार्थी शब्द यांचा बहुमोल खजिना लुटता येतो.
उदाहरणार्थ, जंगल या शब्दाला – अरण्य, रान, वन, कानन, विपीन असे पर्यायी शब्द कळल्यामुळे आपण शब्दसंपन्न होतो. शब्दकोडे सोडवताना गंमत येतेच, शिवाय बौद्धिक व मानसिक निर्मळ आनंद मिळतो. कालानुरूप शब्दांच्या अर्थकक्षा कशा रुंदावल्या व फैलावल्या यांची जाण शब्दकोड्यामुळे येते. अशा प्रकारे शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते.
3. विश्वकोश पाहण्याचे तुमच्या लक्षात आलेले फायदे लिहा.
प्रश्न 1.
विश्वकोश पाहण्याचे तुमच्या लक्षात आलेले फायदे लिहा.
उत्तर:
आपल्याला माहीत नसलेल्या विषयांची सांगोपांग माहिती मिळवण्यासाठी विश्वकोश आपला मदतनीस होतो. त्या विषयाच्या अनुषंगाने असलेले संलग्न विषय कळतात व विषयसाखळीमुळे त्या त्या विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त होते. आपले ज्ञानाविषयीचे कुतूहल शमवण्याचे विश्वकोश हे एक उत्तम साधन आहे. विश्वकोश पाहण्याने आपले जागतिक ज्ञानक्षेत्राचे क्षितिज विस्तारते. आपल्या अभिव्यक्तीला योग्य चालना मिळते. मराठी विश्वकोश हाताळल्यामुळे सर्व प्रकारचे प्रगल्भ व सूक्ष्म ज्ञान मराठी भाषेतून मिळते व आपल्या ज्ञानविषयक गरजा भागतात.
4. केशभूषेचे उद्देश सांगून, त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो, ते स्पष्ट करा.
प्रश्न 1.
केशभूषेचे उद्देश सांगून, त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो, ते स्पष्ट करा.
उत्तर:
मोकळे केस इतरांना दिसू नयेत, म्हणून पुरातन स्त्रियांनी केशबंधनाची कल्पना राबवली असावी. या कल्पनेतून केशभूषेचा उगम झाला असावा. लेण्यांमधल्या शिल्पकृतीत आढळणाऱ्या स्त्रियांनी केलेल्या प्राचीन केशरचनांचे अनुकरण भारतीय स्त्रिया करताना आढळतात. केशभूषेचा मुख्य उद्देश हा आकर्षकता व सौंदर्य वाढवणे हा आहे. सामाजिक संकेतानुसार प्रतीकात्मक केशभूषा करणे, हा केशभूषेचा सामाजिक उद्देश ठरतो. केशभूषेत केस कापणे, केस धुणे, नीट करणे, विंचरणे, कुरळे किंवा सरळ करणे या गोष्टींचा अंतर्भाव होतो.
5. विश्वकोशाचा उपयोग तुम्हांला मराठी भाषेतील ज्ञान प्राप्त करण्यासाठी कसा होऊ शकेल, ते लिहा.
प्रश्न 1.
विश्वकोशाचा उपयोग तुम्हांला मराठी भाषेतील ज्ञान प्राप्त करण्यासाठी कसा होऊ शकेल, ते लिहा.
उत्तर:
मराठी भाषेतील कोणत्याही विषयाचे ज्ञान मिळवण्यासाठी मराठी विश्वकोश हे अतिशय उत्तम साधन आहे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, तत्त्वज्ञान, क्रीडा व कला इत्यादी अनेक ज्ञानक्षेत्रांबद्दलचे आपले कुतूहल पूर्ण करण्याचे कार्य मराठी विश्वकोशातर्फे सुलभ झाले आहे. मराठी भाषेची व्युत्पत्ती, तिचा इतिहास, वेदांपासून ते अदययावत साहित्याविषयीची सर्वांगीण माहिती व ज्ञान मिळवणे विश्वकोशामुळे सहज झाले आहे. मराठी भाषा ही माझी मातृभाषा आहे. तिच्यावर माझे नितांत प्रेम आहे. मराठी भाषेतील प्राचीन काव्य, अनेकविध रचनाबंध समजून घेण्यासाठी मला मराठी विश्वकोशाचा उपयोग होईल. मराठी भाषेतील अद्ययावत ज्ञानाने माझे व्यक्तिमत्त्व संपन्न होण्यास मदत होईल.
भाषा सौंदर्य:
विश्वकोश अकारविल्ल्यानुसार (अनुज्ञेय) पाहाबा हे आपल्याला कळले. त्यासाठी संपूर्ण वर्णमाला (आता अँव ऑ हे स्वर धरून) आपल्याला क्रमाने मुखोद्गत असायला हवी. त्या योग्य वर्णाची आणि त्यांची उच्चारस्थाने, परिपूर्ण आकलनही असावयास हवे. (उदा., स्वर, स्वरादी, व्यंजन, महाप्राण, मृदू व्यंजने, कठोर व्यंजने, अनुनासिके).
प्रश्न 1.
पुढील कोडे सोडवा:
- पैसे न देता, विनामूल्य.
- पाणी साठवण्याचे मातीचे गोल भांडे.
- जिच्यात रेतीचे प्रमाण खूप जास्त असते अशी जमिनीची जात.
- रहस्यमय.
- खास महाराष्ट्रीय पक्वान्न. पोळ्या, मोदक, करंज्या यांमध्ये हे भरतात.
उत्तर:
वरील कोडे वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याचे उत्तर तुम्हाला सोडवायचे आहे. हे कोडे सोडवल्यावर तुम्हांला निश्चितच भाषेचे सौंदर्य व गंमत लक्षात येईल. अशा कोड्यांचा अभ्यास करा. त्यातील भाषिक वैशिष्ट्ये समजून घ्या व अशी विविध वैशिष्ट्यांची कोडी तयार करण्याचा तुम्ही स्वतः प्रयत्न करा.
मैत्री तंत्रज्ञानाशी:
वडील: (सोनालीच्या आईशी बोलताना.) “अग, लाईटबिल भरण्याची अंतिम तारीख आजच आहे; पण आज माझी ऑफिसमध्ये महत्वाची मीटिंग आहे. काय करावं बरं?”
सोनाली: “बाबा, एवढी काळजी कशाला करता, लाईट बिलच भरायचय ना? आणा इकडे, मी भरते एका मिनिटांत, तेही उन्हातान्हात बाहेर न जाता, धावपळ न करता.”
सोनाली: “अग आई, एवढं आश्चर्यानं काय पाहतेस? आपल्याकडे संगणक आहे, आंतरजाल आहे. आता आपण ऑनलाईन बिल घरच्या घरी भरू शकतो. चल आई, मी तुला ऑनलाईन बिल कसे भरायचे ते दाखवते.”
आई: (मुलगी ऑनलाईन बिल भरते. आई-वडील तिच्या कृतींचे निरीक्षण करतात.) “शाबास बाळा! किती आत्मविश्वासाने संगणक हाताळतेस. बाजार करणं, बिलं भरणं, खरेदी करणं, वस्तू विकणं, असे ऑनलाईन व्यवहार मलाही शिकव.”
प्रश्न 1.
कमी वेळात, कमी कष्टात ऑनलाईन प्रक्रियेद्वारे तुम्ही कोणकोणती कामे करू शकता? त्यांची यादी करा.
उत्तर:
- लाईट बिल भरणे
- टेलिफोन बिल भरणे
- गॅसचे बिल भरणे
- आवश्यक वस्तू खरेदी करणे
- वस्तू विकणे
- गृहोपयोगी वस्तूंची मागणी करणे
- प्रवासासाठी बस, रेल्वे, विमान किंवा खाजगी वाहन यांची बुकिंग करणे
- भेटवस्तू पाठवणे.
उपक्रम:
प्रश्न 1.
ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी उपलब्ध असलेले विविध अॅप्स कोणते?
त्यांचा वापर कसा करावा याविषयीची माहिती मिळवा.
विश्वकोश Summary in Marathi
पाठाचा परिचय:
या पाठात विश्वकोशाची ओळख करून दिली आहे. विश्वकोश का व कसा तयार झाला, वेगवेगळे संदर्भ मिळवण्याची आनंददायी प्रक्रिया, भाषासमृद्धी, तसेच एका विषयाच्या निमित्ताने अनेक संलग्न विषयांची माहिती मिळणे, ही विश्वकोशाची वैशिष्ट्ये आहेत.
पाठातील महत्त्वाचे मुद्दे:
1. आपल्या शाळेत, गावात, शहरात ग्रंथालय (वाचनालय) असते. मराठीतील विविध साहित्यसंपदा व अनेक विषयांची पुस्तके उपलब्ध होतात. मराठी विश्वकोश, मराठी चरित्रकोश, मराठी व्युत्पत्तिकोश इत्यादी ग्रंथसंपदा हा प्रत्येक ग्रंथालयाचा ‘मानबिंदू’ आहे.
2. मानव्यविदया (Social sciences), विज्ञान (Pure science) व तंत्रज्ञान (Technology) यांतील सर्व विषयांचे आजतागायतचे ज्ञान संकलित करण्यासाठी विश्वकोशाची निर्मिती झाली. मुख्य विषय व त्याच्या संलग्न विषयाचे ज्ञान मिळवण्यासाठी मराठी विश्वकोशाचा उपयोग होतो.
3. विश्वकोशाची गरज: भारतात शिक्षणाचा प्रसार वेगाने होऊ लागला. वाढत्या औदयोगिकीकरणामुळे समाजाच्या वैज्ञानिक व तांत्रिक गरजा वाढू लागल्या. अनेक शब्द अस्तित्वात येऊन भाषा समृद्ध होऊ लागली. त्यामुळे सर्वविषयसंग्राहक अशा विश्वकोशाची गरज निर्माण झाली.
उच्च शिक्षणाचे माध्यम म्हणून मराठी भाषेचा स्वीकार झाला. त्यामुळे मराठीमध्ये निर्माण झालेली संदर्भग्रंथांची तीव्र आवश्यकता, तसेच शासनव्यवहाराची भाषा म्हणून राज्यपातळीवर मराठीला मिळालेली मान्यता या पार्श्वभूमीवर मराठी भाषेतील सर्वविषयसंग्राहक विश्वकोशाची गरज निर्माण झाली. स्वातंत्र्यपूर्वकाळात ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी विश्वकोशाची मुहूर्तमेढ रोवली.
1. विश्वकोश असा तयार झाला…
- विषयवार तज्ज्ञांच्या समितीची रचना केली गेली.
- प्रत्येक विषयाच्या नोंदीची शीर्षके निश्चित केली गेली.
- मुख्य, मध्यम, लहान नोंदींतील मुद्द्यांची टाचणे तयार केली गेली.
- नोंदींच्या मर्यादा आखून टाचणांमध्ये तशा सूचना दिल्या गेल्या.
- प्रत्येक विषयातील मुख्य, मध्यम, लहान व नाममात्र नोंदींच्या यादया तयार केल्या गेल्या.
- अकारविल्यानुसार या यादया लावण्यात आल्या.
1976 या वर्षी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने मराठी विश्वकोशाचा पहिला खंड प्रकाशित केला. सध्या विश्वकोशाचे अठरा खंड प्रसिद्ध आहेत.
2. विश्वकोश यासाठी पाहावा…
- आपल्या ज्ञानविषयक गरजा मराठीतून भागवण्यासाठी.
- जागतिक ज्ञानक्षेत्राचे क्षितिज विस्तारताना आपल्या विविध विषयांतील कुतूहलास इष्ट वळण लागण्यासाठी.
- अभिव्यक्तीला योग्य चालना मिळण्यासाठी.
- सर्व प्रकारचे प्रगल्भ व सूक्ष्म ज्ञान मराठी भाषेतून मिळण्यासाठी.
3. विश्वकोश असा पाहावा…
1. शब्द अकारविल्हे (अनुज्ञेय) नुसार पाहावेत.
2. बाराखडीतील स्वर व व्यंजन यांच्या स्थानानुसार अनुक्रमे दिलेला शब्द पाहावा.
4. मूलध्वनी (मराठी वर्णमाला):
5. व्यंजने (34)
स्वर + व्यंजने = अक्षरे/अर्थपूर्ण क्रमाने येणारी अक्षरे = शब्द/ अर्थपूर्ण शब्दांचा समूह = वाक्य.
चौदाखडी:
तुम्हांला आवडणारे कोणतेही शब्द… त्यांचे अर्थ… संदर्भ विश्वकोशातून शोधा व भाषेचे अनोखे अंग जाणून घ्या. विश्वकोश आता एका क्लिकवर – https://en.wikipedia.org/wiki/Marathi_Vishwakosh
1. मुलांना आवडणारी शब्दकोडी व फँशनपैकी केशरचना या ” शब्दांचे संदर्भ विश्वकोशाच्या आधारे दिले आहेत.
1. शब्दकोडी:
अशा कल्पनांवर आधारलेले अनेक प्रकार रूढ आहेत. संगणकीय खेळांमध्ये विविध प्रकारच्या शाब्दिक कोड्यांचा समावेश होतो.
1. प्रसिद्ध विधान अथवा अवतरण देऊन त्याचे लेखक ओळखण्यास सांगणे. |
2. एका शब्दातील अक्षरे फिरवून नवीन शब्द तयार करणे. |
3. काही शब्दांतील रिकाम्या अक्षरांच्या जागा भरणे. |
2. पुढील शब्दकोडे दिलेल्या वाक्यांच्या आधारे सोडवा:
- ‘स्वेदगंगा’ या कवितासंग्रहाचे कवी.
- एका साहित्यिकाचे आडनाव ‘श्रीपाद कृष्ण …’
- तुरुंगात असतानादेखील ज्यांची काव्यप्रतिभा बहरून येई, असे साहित्यिक (देशभक्त).
- ‘सुधारक’चे संपादक.
- कवी यशवंत यांचे आडनाव.
- एका विनोदी साहित्यिकाचे आडनाव.
- मालतीबाई बेडेकर यांनी वापरलेल्या टोपणनावातील आडनाव.
- कवी कुसुमाग्रज यांचे आडनाव.
उत्तरांसह कोड्याची आकृती : (पाठ्यपुस्तकानुसार)
2. केशभूषा:
आदिम लोक केसांना मातीचा लेप लावून आपला पराक्रम व गुणवैशिष्ट्ये दाखवण्याकरिता त्यात विजयचिन्हे आणि पदके लावत.
( केशभूषेचा उगम यातून झाला असावा. )
(केस इतरांना दिसू न देण्याच्या पुरातन स्त्रीच्या प्रयत्नातून केशबंधाची कल्पना पुढे आली असावी.)
अजिंठा, वेरूळ, कोणार्क, खजुराहो येथील शिल्पाकृतींत आढळणाऱ्या स्त्री-पुरुषांच्या केशरचना उल्लेखनीय आहेत. या प्राचीन केशरचनांचे अनुकरण भारतीय स्त्रिया करताना आढळतात.