MH 9 Marathi

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 6 या झोपडीत माझ्या

Maharashtra Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 6 या झोपडीत माझ्या

Maharashtra State Board Class 9 Marathi Kumarbharti Solutions Chapter 6 या झोपडीत माझ्या (कविता)

9th Std Marathi Kumarbharati Digest Chapter 6 या झोपडीत माझ्या Textbook Questions and Answers

1. कवितेत आलेल्या आशयानुसार पुढील मुद्दयांतील फरक लिहा:

प्रश्न 1.
कवितेत आलेल्या आशयानुसार पुढील मुद्दयांतील फरक लिहा:

झोपडीतील सुखे महालातील सुखे
1. 1.
2. 2.

उत्तर:

झोपडीतील सुखे महालातील सुखे
1. ताऱ्यांकडे पाहत जमिनीवर निजावे. 1. झोपण्यासाठी मऊ बिछाने.
2. देवाचे नाव नित्य गावे. 2. कंदील व शामदाने यांची रोषणाई.

 

2. आकृतिबंध पूर्ण करा:

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा:


उत्तर:

3. चौकटी पूर्ण करा:

प्रश्न 1.
चौकटी पूर्ण करा:

उत्तर:
1. निजावयास जमीन
2. रात्री गगनातले तारे

4. ‘तिजोरी’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.

प्रश्न 1.
‘तिजोरी’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तरे
धनदौलत संग्रहित ठेवण्याचे (साठवण्याचे) साधन कोणते?

 

5. काव्यसौदर्य:

प्रश्न (अ)
‘पाहुनि सौख्य माते, देवेंद्र तोहि लाजे
शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या’. या काव्यपंक्तींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर:
देवांचा राजा इंद्र हा स्वर्गात राहतो. स्वर्गात सर्व सुखे असतात. सुखसमाधान व शांतीचा वास स्वर्गात आहे, अशी कल्पना आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आनंदमय झोपडीचे वर्णन केले आहे. ते म्हणतात – माझ्या झोपडीत सुखसमाधान आणि शांतीचे है साम्राज्य आहे. झोपडीत एवढे पराकोटीचे सौख्य मला लाभते की इंद्रालासुद्धा माझ्या सखाचा हेवा वाटतो. माझे सुख पाहून इंद्राला माझा हेवा वाटतो. झोपडीतील सुखाची महती सांगणारा विचार या ओळीतून व्यक्त होतो.

प्रश्न (आ)
‘दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या’ या काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर:
महालातील धनदौलत ही बंदिस्त असते. तिजोरीला भक्कम कडीकुलूप लावलेले असते. चोरी होऊ नये; म्हणून धनावर सक्त पहारे ठेवले जातात. संपूर्ण महाल कडेकोट बंदोबस्तात असतो. कवी म्हणतात – माझी झोपडी सदैव खुली असते. धनदौलत नसल्यामुळे माझ्या झोपडीचे दार दोऱ्यांनी, कड्याकुलपाने बंद करावे लागत नाही. झोपडीला चोराचे भय नाही. येथे आनंदाने सर्वांचे स्वागत करण्यासाठी माझी झोपडी सताड उघडी असते. या ओळीतून कवीच्या मनाचा मोठेपणा व्यक्त झाला आहे.

1. झोपडी व महाल यांच्यातील संवादाची कल्पना करून संवादलेखन करा.


झोपडी: ………………………………………………………………………..
महाल: ………………………………………………………………………….
झोपडी: ………………………………………………………………………..
महाल: ………………………………………………………………………….
झोपडी: ………………………………………………………………………..
महाल: ………………………………………………………………………….
झोपडी: ………………………………………………………………………..
महाल: ………………………………………………………………………….

 

2. उजळणी- तक्ता पूर्ण करा.

उपमेय – आईचे प्रेम                         उपमान – सागर उपमेय – आंचा   उपमान – साखर
उपमा आईचे प्रेम सागरासारखे असते.
उत्पेक्षा आईचे प्रेम म्हणजे जण सागरच.
रूपक वात्सल्यसिप आई.

3. महण म्हणजे काय?

‘मह’ शाविषय मनोरंजक आहे. आपण व्यवहारात वापरल्या जाणान्या म्हणी – उदा. -‘आये तसे भरा किया ‘गामाता गुळाची चा काय’ यांसारख्या म्हणींचा अभ्यास केला तर, ‘म्हण म्हणजे शहाणपणाने भरलेले वचन.’ या ज्ञानाचा आपल्याला बोलताना, लिहिताना अनेक प्रसंगी उपयोग करता येतो आणि आपले बोलणे, लिहिणे अधिक प्रभावशाली करता येते. भाषेला सौंदर्य प्राप्त होते. किंबहुना त्या भाषेची ती भूषणे आहेत. शब्द म्हणजे वाहूनही कटीन असतात आणि फुलातूनही कोमल असतात, असे म्हटले जाते ते शब्दांच्या अर्वासाठी.

Marathi Kumarbharati Textbook Std 9 Answers Chapter 6 या झोपडीत माझ्या Additional Important Questions and Answers

1. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :

कृती 1: (आकलन)

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा:

उत्तर:

कृती 2: (आकलन)

प्रश्न 1.
चौकटी पूर्ण करा:

उत्तर:
1. मज्जाव
2. पहारे

 

प्रश्न 2.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा:
1. झोपडीतले सौख्य पाहून ………………. लाजतो. (देवेंद्र/सुरेंद्र/वीरेंद्र/राजेंद्र)
2. झोपडीत नित्य ……… विराजते. (भ्रांती/खंती/शांती/भक्ती)
उत्तर:
1. झोपडीतले सौख्य पाहून देवेंद्र लाजतो.
2. झोपडीत नित्य शांती विराजते.

कृती 3 : (दोन ओळींचा सरळ अर्थ)

प्रश्न 1.
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या
उत्तर:
झोपडीत राहण्याचे सुख वर्णन करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात -एखादया राजालाही राजमहालात जे सुखसमाधान मिळाले असेल, ती सर्व सुखे मला माझ्या झोपडीत मिळतात.

पुढील कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा:

प्रश्न 1.
कविता – या झोपडीत माझ्या.
उत्तर:
या झोपडीत माझ्या
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री → राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज.
2. कवितेचा विषय → अत्यंत साध्या राहणीतही परमोच्च सुख साठलेले असते. सुख व शांती माझ्या झोपडीत कशी मिळते, याचे निवेदन या कवितेत केले आहे.
3. कवितेतील दोन शब्दांचे अर्थ →

  1. सौख्य = सुख
  2. भूमी = जमीन
  3. नाम = नाव
  4. मज्जाव = मनाई
  5. भीती = भय
  6. मऊ = नरम
  7. बोजा = वजन, भार
  8. सदा = सतत.

4. कवितेतून मिळणारा संदेश → श्रीमंतीचा, वैभवाचा हव्यास करू नये, जे प्राप्त परिस्थितीत मिळते, ते जास्त सुखकारक असते. शुद्ध मनाने गरिबीत जगताना समाधान मिळते, ही शिकवण मिळते.

5. कवितेची भाषिक वैशिष्ट्ये → कवितेच्या आशयाला पूरक असा सैलसा ‘ओवी’ हा पूर्वीचा लोकछंद या कवितेत आहे. ओवी छंदात तीनही चरणांत यमक साधलेले असते. प्रस्तुत रचनेचा सहजपणे तत्त्व बिंबवण्याचा गुण आहे. पैसा, दौलत, श्रीमंती हे चोरीला उत्तेजन देणारे घटक आहेत; परंतु गरिबाच्या मनातील निर्मळ भाव हा त्यास अभय देतो हा संदेश इतक्या सोप्या शब्दांत मांडला आहे की, ओवी सहज ओठात रुळते. गुणगुणावीशी वाटते. प्रत्येक ओवीचा शेवट – ‘या झोपडीत माझ्या’ असा केल्याने आशयाची घनता वाढते.

6. कवितेतून व्यक्त होणारा विचार → महालातील सुखे व झोपडीतील सुखे यांची तुलना या कवितेत केली आहे. झोपडीतल्या साध्या राहणीत सुखसमृद्धी व शांती मिळते, हे सांगितले आहे. साधी राहणी, उच्च विचारसरणी मनात ठसवली, तर मानसिक सुख लाभते.

7. कवितेतील दोन ओळींचा सरळ अर्थ :
पाहूनि सौख्य माते, देवेंद्र तोहि लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या
→ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज झोपडीचे माहात्म्य सांगताना म्हणतात-झोपडीत राहण्याचे माझे सुख पाहून इंद्रही मनात लाजतो. माझ्या सुखाचा इंद्राला हेवा वाटतो. माझ्या झोपडीत नेहमी सुखशांती नांदते.

8. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे → राजालाही जी सुखे मिळत नाहीत, ती माझ्या झोपडीत आहेत. खुल्या निसर्गात, जमिनीवर पहुडताना, मानाने, सुखासमाधानाने जगावे, हे अतिशय सहजपणे कवितेत बिंबवले असल्यामुळे ही कविता मला खूप आवडली.

 

पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा:

प्रश्न 1.
‘पाहून सौख्य माते, देवेंद्र तोहि लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या’
उत्तर:
आशयसौंदर्य: राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी ‘या झोपडीत माझ्या’ या कवितेत महालातील सुखे व झोपडीतील सुखे यांची मार्मिकपणे तुलना केली आहे. श्रीमंतीचा, वैभवाचा बडेजाव न करता झोपडीतल्या साध्या राहणीत सुख-समृद्धी व शांती मिळते, हा आशय या कवितेत सहजपणे नोंदवला आहे.

काव्यसौंदर्य: प्राप्त परिस्थितीत शुद्ध मनाने जगताना समाधान मिळते. खुल्या निसर्गात, जमिनीवर पहुडताना जे सुख मिळते, ते देवाच्या देवालाही मिळत नाही, असे या प्रस्तुत ओळींत सांगितले आहे. माझे झोपडीत राहण्याचे सुख पाहून देवेंद्रही लाजतो. त्याला माझ्या सुखाचा हेवा वाटतो; कारण देवेंद्रालाही न मिळणारी शांती माझ्या झोपडीत विराजमान झाली आहे. माझ्या झोपडीत निरामय शांती वसत आहे, असे कवींना म्हणायचे आहे.

भाषिक वैशिष्ट्ये: कवितेच्या आशयाला पूरक असा सैलसा ‘ओवी’ हा प्राचीन लोकछंद या कवितेत आहे. ओवी छंदात तीनही चरणांत यमक साधलेले असते. प्रस्तुत रचनेचा सहजपणे तत्त्व बिंबवण्याचा गुण आहे. पैसा, दौलत, श्रीमंती हे चोरीला उत्तेजन देणारे घटक आहेत; परंतु गरिबाच्या मनातील निर्मळ भाव हा त्यास अभय । झोपडीत माझ्या’ असा केल्याने आशयाची घनता वाढते. तसेच ‘या’ देतो हा संदेश इतक्या सोप्या शब्दांत मांडला आहे की, ओवी सहज , हा शब्द एकाच वेळी सार्वनामिक विशेषण व क्रियापद या दोन्ही ओठात रुळते. गुणगुणावीशी वाटते. प्रत्येक ओवीचा शेवट-‘या है अंगाने अर्थवाही झाला आहे.

भाषाभ्यास:

(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती:

शब्दसिद्धी:

प्रश्न 1.
उपसर्गघटित व प्रत्ययघटित प्रत्येकी दोन शब्द लिहा.
उत्तर:

उपसर्गघटित प्रत्ययघटित
अविचार बालपण
सुविचार म्हातारपण

 

(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती:

1. शब्दसंपत्ती:

प्रश्न 1.
विरुद्धार्थी शब्द लिहा:

  1. मऊ
  2. महाल
  3. नित्य
  4. शांती.

उत्तर:

  1. मऊ × टणक
  2. महाल × झोपडी
  3. नित्य × अनित्य
  4. शांती × अशांती.

प्रश्न 2.
तक्ता भरा:

एकवचन तारा झोपडी
अनेकवचन तिजोऱ्या बिछाने

उत्तर:

एकवचन तारा तिजोरी झोपडी बिछाना
अनेकवचन तारे तिजोऱ्या झोपड्या बिछाने

2. लेखननियम:

प्रश्न 1.
अचूक शब्द ओळखा:

  1. माजाव, मज्जाव, मज्जव, माज्जाव.
  2. प्रभुनाम, परभुनाम, प्रभूनाम, प्रभुनमा.
  3. भिती, भिति, भीति, भीती.
  4. तिजोरि, तीजोरी, तिजोरी, तीजोरि.

उत्तर:

  1. मज्जाव
  2. प्रभुनाम
  3. भीती
  4. तिजोरी.

 

3. विरामचिन्हे:

प्रश्न 1.
जोड्या लावा:
(अ) [ . ] [ ; ] [ ‘ ‘ ] [ – ]
(आ)

  1. एकेरी अवतरणचिन्ह
  2. पूर्णविराम
  3. संयोगचिन्ह
  4. अपूर्णविराम

उत्तर:
[.] पूर्णविराम
[;] अपूर्णविराम
[‘ ‘] एकेरी अवतरणचिन्ह
[ _ ] संयोगचिन्ह

या झोपडीत माझ्या Summary in Marathi

कवितेचा आशय:

लहानशा झोपडीतही सुख, शांती आणि आनंद नांदत असतो. महालातली सुखे झोपडीतही प्राप्त होतात. अशा प्रकारे झोपडीतल्या वैभवाचे वर्णन अतिशय साध्या शब्दांत या कवितेत केले आहे.

शब्दार्थ:

  1. महाल – राजवाडा, प्रशस्त घर.
  2. सौख्ये – सुखे, वैभव.
  3. प्राप्त झाली – मिळाली, लाभली.
  4. भूमी – जमीन.
  5. प्रभुनाम – देवाचे नाव, भजन.
  6. नित्य – नेहमी, सतत.
  7. पहारा – रखवाली, नजरकैद.
  8. तिजोरी – खजिनापेटी.
  9. तया – त्या.
  10. मज्जाव – अटकाव, निबंध.
  11. शामदाने – काचेचा दिवा, झुंबर.
  12. माने – सन्मान.
  13. सुखे – आरामात, सुखाने.
  14. बोजा – वजन, (इथे अर्थ) दडपण, धाक.
  15. माते – माझे.
  16. देवेंद्र – इंद्र, देवांचा राजा.
  17. लाजे – शरमतो.
  18. सदा – नेहमी.
  19. विराजे – शोभते, नांदते.

 

कवितेचा भावार्थ:

एखादया राजाला राजमहालात जी सुखे मिळाली असतील, ती सर्व सुखे माझ्या झोपडीत मला लाभली आहेत. अंगणातल्या जमिनीवर आरामात निजण्याचे नि रात्री आकाशातील चांदण्यांकडे, ताऱ्यांकडे पाहण्याचे सुख मला या झोपडीत मिळते. देवाचे भजन नेहमी गात या झोपडीत मी आनंदात राहतो.

महालांमध्ये तिजोऱ्यांमधून धन साठवून ठेवलेले असते; त्यावर सक्त पहारे ठेवले जातात. तरी सुद्धा तेथे चोऱ्या होतात. माझ्या झोपडीच्या दारांना कवाडे नाहीत, ती सताड उघडी आहेत. माझ्या झोपडीला चोरांचे भय नाही; चोरण्याइतपत दौलत नसल्यामुळे माझ्या झोपडीला पहारे नाहीत.

राजवाड्यात परवानगीशिवाय शिरकाव होत नाही. ‘अटकाव’ हा शब्द तिथे असतो. माझ्या झोपडीत येण्यासाठी भीती वाटणार नाही. झोपडीत सर्व माणसांचे खुले स्वागत आहे. महालामध्ये आरामासाठी मऊ बिछाने असतात नि कंदील, झुंबरांची रोषणाई केलेली असते. माझ्या झोपडीत जमिनीवर पहुडणे हाच सन्मान आहे. धरतीचाच बिछाना आहे.

माझ्या झोपडीत कुणीही प्रेमाने या नि प्रेमाने जा. माझ्या झोपडीत ये-जा करताना कुणाच्याही मनावर दडपण असत नाही. झोपडीत राहण्याचे माझे सुख पाहून इंद्रही मनात लाजतो. माझ्या सुखाचा हेवा वाटतो. माझ्या झोपडीत नेहमी सुखशांती नांदत आहे.

The Complete Educational Website

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *